श्री सप्तकोटीश्वर सेवा मंडळाची स्थापना २७ एप्रिल २०१४ रोजी झाली व त्यानंतर माननीय धर्मदाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. दिनांक ९ सप्टेंबर २०१४ रोजी श्री सप्तकोटीश्वर सेवा मंडळाची अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर विविध कार्यकारी समित्या निर्माण करुन त्यांना विविध जबाबदार्‍या देण्यात आल्या.

मंदिराची तपासणी (Structural Audit)  करुन घेऊन मंदिराच्या दुरुस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम त्वरीत हाती घेण्यात आले. मंदिरासमोर व भाविकांना बसण्याच्या जागी मार्बोग्रॅनाईट लाद्या लावण्यात आल्या.

श्री. रोहीत मोघे यांची  मंदिराच्या ट्रस्टचे अधिकृत हिशेब तपासनीस (C.A.) म्हणून नेमणूक करण्यात आली.

 
 
श्री सप्तकोटीश्वर मंदिर © २०१७ सर्व अधिकार राखिव