मंदिरात येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पुर्ण करणारा अशी सप्तकोटीश्वराची ख्याती आहे.

अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास गतवर्षी मुंबईत येणारा पाऊस खुपच लांबला. जुलै महिना सुरु झाल्यावर सुद्धा पावसाने दडीच मारली. हिच परिस्थिती सर्व महाराष्ट्रात होती.

त्यावेळी, श्री सप्तकोटीश्वर सेवा मंडळाच्या विश्वस्तांनी लवकर पाऊस पडण्यासाठी शंकराला साकडे घालून 'गूढ पुजा' केली. प्रत्येक भाविकाने ११ घागरी पाणी घालून श्री सप्तकोटीश्वराला पाण्यात बुडवून त्याची पाऊस पडावा म्हणून विनवणी केली.

या गूढ पूजेला श्री सप्तकोटीश्वर पावला व पुजेच्या वेळेस पावसाचे थेंब आले व लगेचच एक दिवस सोडून मुसळधार मोसमी पाऊस सुरु झाला व भाविकांना श्री सप्तकोटीश्वराच्या सामर्थ्याची यथायोग्य प्रचिती झाली.

 
 
श्री सप्तकोटीश्वर मंदिर © २०१७ सर्व अधिकार राखिव